सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

बाल आनंद मेळावा २०१७-१८

created by Asha Chine


👫👫👫👫👫👫👫

जि प प्राथ शाळा तळेवस्ती गंगाधरी
ता. नांदगाव, नाशिक,

आयोजित.....

बाल आनंद मेळावा


👫👫👫👫👫👫👫

२०१७-१८
दि.२३/०९/२०१७
वेळ - सकाळी ९.०० वा.
इ १ ली  ४ थी 
विद्यार्थ्यांना व्यावहारिक, व्यावसायिक  ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी शाळेचा यशस्वी उपक्रम...
      आज दि २३/९/२०१७ रोजी आमच्या शाळेत ठीक ९.०० वाजता बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी शाळा व्य. समिती, शिक्षक पालक, माता पालक समिती, ग्रामपंचायत सदस्य, पालक, ग्रामस्थ तसेच नांदगाव तालुका शिक्षण विभाग यांना निमंत्रित करण्यात आले. 

         शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्रीमती ठोके मॅडम यांनी फीत कापून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन केले.

सोबतच पोखरी केंद्रातील बागुल सर, शिंदे सर, पगार सर तसेच फटांगरे सर (विशेष शिक्षक) उपस्थित होते.

श्री गंगाधर कर्नर, शिवाजी कर्नर, बाळू ठोंबरे, सौ. अलका कर्नर,चंद्रकला कर्नर,मुक्ता ठोंबरे, , सरला शिंदे, कविता शिंदे, निर्मला शिंदे, , , भागवत, कविता भागवत, मनीषा ठोंबरे, लंका ठोंबरे, आदी महिला व माया कर्नर, मीना कर्नर, माजी विद्यार्थी  उपस्थित होते.

        विद्यार्थ्यांनी पाववडे, भजी, भेळ, स्टेशनरी, जनरल स्टोअर्स, फळे, शेंगा, भाजी, भुट्टा, स्वीट,मनोरंजक खेळ आदी दुकाने लावली होती.
          सगळीकडे आनंदी आनंद होता.

        मा विस्तार अधिकारी ठोके मॅडम यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या व कौतुकास्पद उपक्रमासाठी आम्हा शिक्षकांना व विद्यार्थ्यांना प्रेरणा आशीर्वाद दिले. समाधान व्यक्त केले. महिलांशी संवाद साधला. उपक्रम सर्वांपर्यंत पोचविण्यासंबंधी सूचना केल्या. 



फलित
या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी 
प्रत्यक्ष खरेदी विक्री, 
नफा-तोटा, 
हिशोब, 
तोंडी मूलभूत गणिती क्रिया,
स्वयं- अध्ययन, 
मेहनत व मेहनतीची,कष्टाची कदर,
सामाजिक अनुभव, 
नवीन संबोध, 
नवीन शब्द, 
वेळेचे नियोजन,
व्यावसायिक शिक्षण 
स्वानुभव व आनंद मिळविणे
या गोष्टी शिकल्या.

उपक्रमाचे नियोजन श्रीमती आशा चिने मॅडम व गोरख जाधव सर यांनी केले.
आपल्यापर्यंत हा उपक्रम पाठविण्याचा प्रयत्न केला आहे , आम्हांला आशा आहे की आपल्याला नक्की आवडेल !!!


फोटोग्राफी श्री गोरख जाधव सर 

by ASHA CHINE

कार्यक्रमाचे बोर्ड व फलकलेखन BY ASHA CHINE


शाळा व्य. समिती, शिक्षक पालक, माता पालक समिती, ग्रामपंचायत सदस्य, पालक, ग्रामस्थ तसेच नांदगाव तालुका शिक्षण विभाग शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्रीमती ठोके मॅडम

 कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्रीमती ठोके मॅडम यांचे हस्ते 

शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्रीमती ठोके यांचे स्वागत करताना मी 

पोखरी केंद्रातील शिक्षक श्री शिंदे सर (शाळा ढोकरेवस्ती) यांचे स्वागत करताना श्री गोरख जाधव सर , सोबत शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्रीमती ठोके

श्री फटांगरे सर (विशेष शिक्षक ) यांचे स्वागत करताना श्री गोरख जाधव सर , सोबत शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्रीमती ठोके

पोखरी केंद्रातील शिक्षक श्री पगार सर (शाळा दत्तवाडी) यांचे स्वागत करताना श्री गोरख जाधव सर , 

पोखरी केंद्रातील शिक्षक श्री बागुल  सर (शाळा दत्तवाडी)
सोबत शा व्य समिती सदस्य श्री शिवाजी कर्नर 





















































































पहा व्हिडिओ...

मग आवडला का उपक्रम ...
चला तर मग ...
राबवा आपल्या शाळेवर ...
आणि कळवा आम्हांला किती आनंदाचा मेळावा आहे ते...

👫👫👫👫👫👫👫
उपक्रम संकल्पना व शब्दांकन 
श्रीमती आशा चिने..
शाळा तळेवस्ती
धन्यवाद...
धन्यवाद !!!

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!