सूचना

BLOG HEAD च्या वर DROPDOWN MENU मधून आपल्याला शासन निर्णय,AUDIO,VIDEO,विषयनिहाय व इयत्तानिहाय माहिती तसेच इतर माहितीही मिळेल.

२०१७-१८ च्या शाळा तळेवस्तीच्या उपक्रमांचे पुस्तक- निर्मिती श्रीम.आशा चिने



पुस्तक पाहण्यासाठी/वाचण्यासाठी फक्त पाने पलटवावेत...

शाळेची यशोगाथा

शाळेची यशोगाथा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेवस्ती (गंगाधरी) , तालुका - नांदगाव ( नाशिक) आपले सहर्ष स्वागत करित आहे.
शाळेचे नाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तळेवस्ती गंगाधरी, ता. नांदगाव, जि. नाशिक 


    
       गावाबद्दल थोडक्यात – तळेवस्ती ही वस्ती गंगाधरी गावांतर्गत येते.महादेवाचे मंदिर परिसरातच आहे त्यामुळे भगवान बाबाचे तळे म्हणून गावाची ओळख आहे .तळेवस्तीला बसचा थांबा नसून बसने अथवा खाजगी वाहनाने येवला रोडला उतरल्यास पायी सहज शाळेत पोहचू शकता. नांदगावला रेल्वे स्टेशन आहे. फक्त ४ किमी वर शाळा आहे . औरंगाबाद रोडने गंगाधरीची मुख्य शाळा लागते नंतर दत्तवाडीची शाळा आणि शेवटी तळेवस्तीची शाळा आहे .तळेवस्ती हे डोंगर टेकड्यांवरील गाव आहे. लोकसंख्या जेमतेम ३५०-४०० आहे. शेतजमीन काळी कसदार तसेच खड्यांची देखील आहे.
शाळेची स्थापना – १ ऑक्टोबर २००५
शाळेचे ब्रीद – विद्या विनयेन शोभते॥
माजी विद्यार्थी – शिक्षक, प्रगतीशील शेतकरी, उद्योजक

शाळेची पटसंख्या – इ. १ ली – १०, इ. २ री – १४, इ. ३री – ८, इ. ४थी – १३, एकूण – ४५
( २०१८-१९ नुसार )पहिली प्रवेश सुरु 
शाळेची प्रवेश प्रक्रिया – शासकीय नियमाप्रमाणे, शाळेत नवागतांचे भेट वस्तू देऊन स्वागत
शाळेचा यु डायस – २७२००८०३३०५
शाळेचा इमेल – talevastig@gmail.com

talevasti@mail.com
प्रवेश फी – निःशुल्क
खेळाचे मैदान – आहे, खेळाचे साहित्य आहे.
शाळेची यशोगाथा –


शाळेत राबविले जाणारे उपक्रम

1. स्वच्छ शाळा , सुंदर शाळा ,सुंदर परिसर
शाळा-परिसर स्वच्छतेचे महत्व


2. ज्ञान रचना वादानुसार अध्ययन-अध्यापन 


3. Musical दैनिक आदर्श परिपाठ     परिपाठात दिनांक व सुविचार, दिन विशेष वाचन करणे.


 4. ओझ्याविना अध्ययन.. दप्तर विना शाळा.. दफ्तरमुक्त शाळा ..आठवड्याचे नियोजन , जसे सोमवार, मंगळवार, बुधवार .. भाषा व गणित साहित्य, गुरुवारी प.अभ्यास, शुक्रवारी English (English Day),  शनिवारी दप्तराविना .. कृतीयुक्त, दररोज दुपारी कला , कार्यानुभव, शारीरिक शिक्षण इ. यां लवचिकता आहे..

 यांत जुनी पुस्तके शाळेत जमा आहेत. त्यामुळे अजुनच ओझे हलके असते
 एखादी  activity  पूर्ण  केल्यावर  त्या  विद्यार्थ्याला खेळण्यास आवडीचा खेळ खेळण्यास देणे (स्थानिक  खेळ) जसे. डावपेच, गोट्या  इ.  , शाळेत जास्तीत जास्त खेळाचे साहित्य उपलब्ध करून दिले आहे.

5. १००% पटनोंदनी, उपस्थिती व गुणवत्ता.


6. सांस्कृतिक स्पर्धा 
पालकांचा सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थी सहभाग चांगला.


7. वृक्षारोपण/वृक्षसंवर्धन
    वृक्षसंवर्धनाचे संस्कार 


8. १ ते १०० पर्यंतच्या संख्यांच्या दृढीकरणासाठी उपक्रम.


9. डिजिटल शाळा... विद्यार्थ्यांनी स्वतः Tablet खरेदी करून वापर... आठवड्यातून एकदा चित्रपट दाखविण्याचा प्रयत्न..


10 . शब्दांपासून वाक्ये  तयार  करणे, निबंध , शब्दडोंगर, गोष्ट तयार करणे , इ . ज्ञानरचनावादावर भर.


11.प्रत्येकाचा वाढदिवस नावीन्यपूर्ण साजरा केला जातो


12. सराव पेपर पालकांच्या मदतीने सोडवुन घेतो. 


13. वक्तृत्व कला वृध्दींगत करण्यासाठी तोंडी भाषणाचा सराव


14. वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन


15. क्रीडा स्पर्धा.. क्रीडास्पर्धेत यश


16. पिण्यासाठी शुद्ध पाणी 


17. स्वच्छता गृहाचा नियमित वापर

मुलांसाठी स्वतंत्र शौचालय – स्वच्छतागृह

मुलींसाठी स्वतंत्र शौचालय - स्वच्छतागृह


18. हातधुवा मोहीम

हात धुण्याची प्रत्येकाला सवय

जेवणाच्या अगोदर हात धुणे

हात धुण्यासाठी  6 पायर्‍यांचा नियमित  वापर.


19.  मध्यान्ह भोजन शिस्तीने


20. चित्रकला स्पर्धा


21.रांगोळी स्पर्धा


22. कथेचे सादरीकरण


23. घड्याळ  वाचन.. खेळातून.. मैदानावर, जमिनीवर, तसेच Tablet मधील applications वापरूनही .

.
24.  दैनिक  वृत्तपत्र  वाचून  त्यावर  गप्पा  मारणे.


25. इंग्रजीचे कुठलेही  स्पेलिंग  तयार करणे व वाचणे


26. .इंग्रजीतून संभाषण - त्यात आपण  नेहमी  विचारतो असे 125 वाक्ये.


27. . 99 पर्यंतचा कोणताही  पाढा काही सेकंदात  तयार करतात  .


28. गणिती क्रिया  करण्यासाठी भरपूर  साहित्य आहे.  वेगवेगळ्या पद्धतींचा वापर.


29. गटनिहाय अभ्यास, कृतीयुक्त अध्यापनावर भर, चित्रकला स्पर्धा


30. पालक भेट... गैरहजर मुलांना  शाळेत  आणण्यासाठी घरी जाणे. गैरहजर विद्यार्थ्यांची भेट..


31. बालवाचनालय..


32. कविता , गाणी यांसाठी टेपचा वापर


33.  पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीची चर्चा पालकभेट घेऊन अथवा फोनवरुन.


34. जास्तीत जास्त शैक्षणिक साहित्याचा वापर  .


35. आठवड्यातून एक दिवस रंगीत ड्रेस


36. वैयक्तिक अध्यापनावर भर... शिक्षक बनतात सुलभक.


37. अपूर्णांक  वाचन


38.  शब्द  बॅकेचे 30 एक उपक्रम


39. विद्यार्थ्यांचे पेपर त्यांच्या  समोरच तपासणे 


40.  विद्यार्थी १ते १०, १ ते१००,

 १ते१०००झटपट बेरीज करतात.


41. मातीपासून  विविध  वस्तू  बनवणे.


42. रांगोळी स्पर्धा


43. दुपारी कृतीयुक्त अध्ययनासाठी बालमित्र सोडविणे.


44. पहिलीला  दाखल  होणारे  विद्यार्थी  मार्चपासूनच शाळेत  येऊ देणे व पुर्व तयारी.


45.  बालांगण हे बालकेंद्र उभारण्यात आले.6 वर्षाच्या आतील मुलांचे चित्र, अंक वाचन ........व त्यासाठी पालक सहकार्य...


46. प्रदर्शन फलक


47. पक्षी खानावळ


48. दररोज तारखेचा पाढा... तीन पाढे काल, आज उद्या तारीख पाढा. पाढे समृद्धी, संख्या समृद्धी साठी जमीन वर पेंटिंग .


49. डोमिनोचा वापर करून संख्या ओळख.


50. शिक्षक मुलांबरोबर खेळतात.


51. वृक्ष दत्तक योजना


52. आनंददायी शालेय वातावरण.


53. बाल आनंद मेळावा, खाद्य पदार्थांचे गाळे


54. बालक पालक मेळावा 


55. महिला मेळावा


56. हळदी कुंकू स्वतंत्र कार्यक्रम


57. बिगुल वादन


58. वैयक्तिक स्वच्छतेची पाहणी .. बुधवार


59. नकाशावाचन -  जिल्हा  ते जग


60. स्वच्छता  कामाचे वाटप मैदान, वर्ग स्वच्छता इ.


61. गांडूळ खत प्रकल्प.


62. पाहुण्यांचे शिक्षकांचे अनोख्या पद्धतीने स्वागत.


63. हुशार विद्यार्थ्यांच्या मदतीने अध्यापन, संधी.


63.रोजचे स्पेलिंग


64.सामान्यज्ञानावर आधारित रोज एक प्रश्न


65. दिनांकानुसार पाढा


66. शिक्षकांच्या वक्तशीर पणामुळे पालकात तालुक्याला कौतुक


बक्षीस योजनेमुळे सहभागी विद्यार्थ्यांमध्ये वाढ


तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षकवृंद

१. श्रीमती आशा चिने : मुख्याध्यापिका : शिक्षण बी. ए. (इंग्रजी ) डी एड्.

अध्यापनाचा अनुभव – १० वर्षे, अनेक शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी

(कालावधी जाने.२००९- मे २०१८ ) सध्या तालुका सिन्नर, जिल्हा - नाशिक  

२. श्री.गोरखनाथ जगन्नाथ जाधव – शिक्षण बी.ए.डी.एड्

अध्यापनाचा अनुभव – १२ वर्षे, अनेक शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी
शाळेची उपक्रमशील शाळा म्हणून निवड……
आपल्या शाळा आपले वैभव, हे वैभव असेच वाढावे म्हणून मुलांना मराठी शाळेत शिकवा,
मातृभाषेतून शिक्षणाशिवाय अन्य कोणत्याही भाषेतील शिक्षण बालकांवर ओझेच होय – यशपाल समिती, भारत सरकार.
        
  धन्यवाद  तळेवस्ती  आशा चिने (उपक्रम २०१७ - १८) 

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया मला जरूर कळवा . धन्यवाद !!!